मुंबईहून औरंगाबादेत आणलेला एम.डी. नावाचा ड्रग्ज आणि चरस एका चारचाकी वाहनातून वेदांतनगर पोलिसांनी आज पंचवटी चौकातून जप्त केले आहे. हे ड्रग्ज शहरात विक्रीसाठी आणले जात असावे, अशी शक्यता पोलीस निरीक्षक रामेश्वर रोडगे यांनी व्यक्त केली आहे.
नुरोद्दीन बदरोद्दीन सय्यद वय-41 (भारतनगर, बांद्रा मुंबई), असिक अली मुसा कुरेशी वय-41 (रा.कुर्ला, मुंबई) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. या प्रकरणी अधिक माहिती अशी की, आज सकाळी एम.एच.20 ए.आर.0002 या वाहनातून अमली पदार्थ आणले जात असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी पंचवटी चौकात सापळा रचून ती चारचाकी वाहन थांबविले. त्या गाडीची झडती घेतली असता त्यामध्ये एम.डी. नावाचे ड्रग्ज च्या 13 पुड्या व चरस अंमलीपदार्थाच्या 25 पुड्या आढळून आल्या आहेत. काळ्या बाजारात या ड्रग्स ची सुमारे 80 ते एक लाख रुपये किंमत असावी असा अंदाज आहे. या प्रकरणी दोन्ही आरोपीसहित एक वाहन पोलिसांनी जप्त केली आहे. वेदांतनगर पोलिस ठण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. शहरात ड्रग्ज आढळून आल्यामुळे खळबळ उडाली आहे. मुंबई एनसीबीकडून मोठ्या प्रमाणात छापे टाकण्यात आले आहे. मुंबईतूनच हे ड्रग्ज आल्यामुळे मुंबईतील ड्रग्जचा साठा अन्य शहरात पसरविला जात असल्याचे बोलले जाते.